मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (08:52 IST)

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या

मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. गोरेगावच्या बांगुरनगर परिसरात असलेल्या इन्फिनिटी मॉलच्या पाठीमागे हा खळबळजनक प्रकार घडला. दोघांचीही ओळख पटली असून रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.
 
इनफिनिटी मॉलजवळ रात्री 8 ते 9 च्या दरम्यान 25 वर्षीय तरुणाने अचानक फायरिंग सुरू केली. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या तरुणाने आधी 22 वर्षीय मुलीचा खून केला आणि त्यानंतर स्वत:वरही गोळ्या झाडल्या. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर गोळीबार करणाऱ्या तरुणानेही नंतर प्राण सोडले.