मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (08:59 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात, १ ठार तर १६ गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबईच्या कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेली बस ही साताऱ्यातून मुंबईकडे येत होती. त्यावेळी अचानक एका ट्रेलर किंवा ट्रक यासारख्या अवजड वाहनाने एसटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसच्या एका बाजूचा पत्रा पूर्णपणे कापला गेला. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन जुन्या एक्सप्रेस वे वर जाताना येणाऱ्या पनवेल एक्झिटजवळ हा अपघात झाला. ही बस पुण्याहून मुंबईत येत होती. त्याचवेळी रात्री 1.30 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही मृत व्यक्ती ही मुंबईतील बेस्टचे चालक आहे.