सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (14:55 IST)

अमोल मिटकरींबाबतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचं विधान

abdul sattar
बंडखोर आमदार आमच्या संपर्कात आहेत, अशी खळबळ उडवून देणाऱ्या अमोल मिटकरींबाबतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. राष्ट्रवादीतून अनेक लोक आमच्याकडे येतात. अमोल मिटकरीसुद्धा आमच्या संपर्कात आहेत, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केलाय. अब्दुल सत्तार अकोला दौऱ्यावर आहेत, त्यावेळी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
 
आताच्या सरकारमधील अनेक लोक आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना सत्तार यांनी मिटकरीच्या आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.  अब्दुल सत्तार म्हणाले की, मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावं लागेल. डॉक्टरच सांगू शकतील, त्यांना नेमकी काय अडचण आहे.