1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (14:53 IST)

महिलेला मारहाण प्रकरणी आता मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

arrest
मंडप उभारण्यावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मारहाण प्रकरणी आता मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा पोलिसांनी मनसे उप विभागप्रमुख विनोद अरगिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.
 
विनोद अरगिली यांच्यासह राजू अरगिले व सतीश लाड अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबादेवी परिसरात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेच्या दुकानासमोर बांबू उभे केले होते, यावेळी पीडित महिलेने दुकानासमोर बांबू उभे करण्यास विरोध केला. ज्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला शिवागाळ करत मारहाण केली, या घटनेचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर युजर्सकडूनही संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांच्या विरोधात नागपाडा पोलिसांनी कलम 323, 337, 506, 504, 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.