शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जुलै 2023 (13:28 IST)

Ahamadnagar :अहमदनगर मध्ये दोन गटात तुफान हाणामारी, एक जखमी

mumbai police
अहमदनगरच्या सावेडी उपनगरात एकविरा चौकात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे.  शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या राड्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या सावेडी उपनगरात एकविरा चौकात दोन गटात दगडफेक झाली आणि तुफान राडा झाला. या घटनेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी जखमी झाले आहे. अंकुश चत्तर असे या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. 
 
शनिवारी रात्री 10:30 च्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला. कारण काय होते हे अद्याप कळू शकले नाही. या गटात तुफान हाणामारी झाली दगड फेक झाली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit