सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (22:11 IST)

छगन भुजबळ यांचा पराभव अटळ : संजय राऊत

sanjay raut
छगन भुजबळ यांनी गद्दारी केल्यानंतर त्यांचा पराभव होतो हा सर्वानाच अनुभव आहे .यंदा देखील त्यांचा  येवल्यातून पराभव अटळ असल्याचे मत शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केले.
 
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले की छगन भुजबळ यांचा शिवसेनेने दोनदा पराभव केला. माजगाव  विधानसभा मतदार संघात तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांच्यासह त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचाही मोठ्या फरकाने पराभव केला आहे . शरद पवार यांच्यानंतर उत्तर सभा वगैरे होत राहतील . परंतु भुजबळ यांचे किती  विठ्ठल आहे हे स्पष्ट करावे. विठ्ठल बदलण्याची सवयच जणूकाही भुजबळ यांना झाली आहे.  शासन आपल्या दारी उपक्रमावर  जनता या सरकारवर नाराज आहे.

जनतेच्या मनातील हे सरकार नाही. या उपक्रमासाठी रेशन दुकानदार आणि शैक्षणिक संस्था यांना माणसे गोळा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते असा आरोप त्यांनी केला. एखाद्या जाहीर सभेसाठी माणसे या शासकीय कार्यक्रमाला गोळा केली जात आहे. रस्त्याला मोठी खड्डे असल्यामुळे अजित दादा पवार यांनी  ट्रेन मधून नाशिकला  आले असल्याचे खा.राऊत यांनी सांगितले.

Edited By - Ratnadeep Ranshoor