शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (07:53 IST)

अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले

ajit panwar
Ajit Pawar entered Sharad Pawars residence for the first time उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काकू प्रतिभा पाटील यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाल्याने विचारपूस करण्यासाठी अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर गेल्याची माहिती मिळत आहे. पण घरी शरद पवार आहेत की नाहीत? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
 
आज अचानक अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याने काकूंची भेट घेण्यासाठी अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी गेल्याचं समजत आहे. काही वेळापूर्वी प्रतिभा पवार यांना ब्रेच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या घरात पाय घसरून पडल्याची माहिती मिळत आहे.