1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑगस्ट 2023 (13:07 IST)

AhmadNagar : चोरीच्या संशयावरून तरुणाला झाडाला टांगून मारहाण

अहमदनगरातून एका तरुणाला झाडाला टांगून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरीच्या संशयातून हा प्रकार घडला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. 
 
अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथे एका तरुणाला शेळी आणि कबुतर चोरल्याचा संशयावरून तिघांनी एका तरुणाला झाडाला टांगून त्याला मारहाण करून त्याच्याचेहऱ्यावर लघुशंका करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या तरुणावर केलेल्या अमानवीय कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 
 
तरुणाच्या पालकांनी आरोपी शुभम, कुणाल आणि ओमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलीस  प्रकरणाचा तपास करत आहे. 
 


Edited by - Priya Dixit