शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2023 (13:12 IST)

अहमदनगर :विहिरीत एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळले

well
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील बाभुळगावातून एकाच विहिरीतून चार मृतदेह आढळण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे मृतदेह पोल्ट्रीफॉर्म वर काम करणाऱ्या रखवालदार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची आहे. पोल्ट्रीफार्मवर काम करणारा रखवालदार धम्मपाल सांगडे त्यांची पत्नी, मुलगा आणि दोन मुलींचा मृतदेह विहिरीत आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
कांचन सांगडे,निखिल सांगडे ,निषिधा सांगडे, आणि संचिता सांगडे अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचे मृतदेह विहिरीत आढळल्यामुळे परिसरात चर्चा सुरु आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, माळीबाभुळगाव हद्दीत फ्लाइंगबर्ड शाळेच्या मागील बाजूस दीपक गोळक यांचा पोल्ट्रीफार्म येथे पाच कुटुंब राहतात त्यात पैकी एक कुटुंब धम्मपाल सांगडे  यांचे आहे. सांगडे आपली पत्नी, दोन मुली आणि एका मुलासोबत राहत होते. धम्मपाल आणि त्यांची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. इतरांनी मध्यस्ती करून हा वाद मिटवण्यात आला. रात्री पुन्हा पती-पत्नीच्या मध्ये वाद झाले. सकाळी पोल्ट्रीफार्मच्या विहिरीतील मोटार सुरु करण्यासाठी पॉलिट्रीफार्म वर काम करणारा गेल्यावर त्याला धम्मपालच्या दीड वर्षाच्या मुलीचे निषिधाचे मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांने तातडीने पोल्ट्रीफार्मच्या चालक दीपक गोळक यांना घटनेची माहिती दिली. दीपक यांनी पोलिसांना कळविले. 
 
 घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. हा अपघात आहे की घातपात याचा शोध लावला जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे.  
 



Edited by - Priya Dixit