Ahmednagar : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ, दगडफेक झाली
गौतमी पाटील ही नेहमी चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमात गोंधळ होतोच आता पुन्हा गौतमीच्या कार्यक्रमात गोधळ झाल्याची बातमी येत आहे. अहमदनगरच्या नवगारापूर येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता. या वेळी काही तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घातला आहे. तरुणांनी कार्यक्रमात दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. तरुणांनी केलेल्या गोंधळामुळे नाराज झाल्या आणि त्यांनी आयोजकांना कार्यक्रम थांबवून व्यवस्थित बंदोबस्त करा आणि माझ्या कार्यक्रमात असाच गोंधळ होणार असेल तर या पुढे मी कार्यक्रम करणार नाही.
गौतमीचा अहमदनगर च्या नवगारापूर येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला महिलांची देखील
उपस्थिती होती. समोर बसलेल्या प्रेक्षकांमुळे मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही आणि ते गोंधळ करतात. मी खूप दिवसानंतर नृत्याचा कार्यक्रम करत होते. नेहमी प्रमाणे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला देखील गर्दी केली होती. मात्र प्रेक्षकांनी केलेल्या गोंधळामुळे मी कार्यक्रम रद्द करते. आणि प्रत्येक आयोजकांना सांगते की या पुढे असाच गोंधळ होणार असेल तर मी इथून पुढे माझे कार्यक्रम बंद करते.
Edited by - Priya Dixit