रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 जून 2022 (15:38 IST)

अजय चौधरीच सेनेचे गटनेते : शिंदे गटाला मोठा धक्का

Ajay Chaudhary
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदेंना  पहिला झटका बसला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू  यांना मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ  यांनी ही मान्यता दिली आहे. विशेष बाब म्हणजे याच गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेला हा दावा मान्य करण्यात आला नाही. नियमानुसार आता शिवसेना गटनेता पदावर अजय चौधरी यांनाच मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची नोंद विधिमंडळात झाली असल्याचं समजतंय. शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता शिंदे गट काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
 
दरम्यान शिवसेनेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे टायमिंगची चर्चा पुन्हा रंगली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये शिंदे म्हणतात, आम्ही बाळासाहेबांचे  कट्टर शिवसैनिक आहोत.