बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (08:04 IST)

पुण्यातील कालव्याचा बंधारा फुटण्याच्या घटनेला महापालिका जबाबदार - अजित पवार

- योग्य काळजी न घेतल्याने घडली दुर्घटना
 
पर्वती नजीकच्या कालव्याचा बंधारा फुटून पाणी जवळच्या विभागात शिरल्याने सामान्य जनतेची तारांबळ उडाली. घडलेल्या प्रकाराला पालिका प्रशासन जबाबदार असल्याची टीका मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. योग्य काळजी घेतली असती तर अशी घटना घडली नसती. याचा पुणेकरांना होणारा त्रास कमी झाला असता, असे पवार यावेळी म्हणाले.
 
दांडेकर पुल जनता वसाहत परिसरात जाऊन अजित पवार यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळवून जनतेला दिलासा दिला. यात जेवणाची व राहण्याची सोय करुन देण्यात आली. त्याचप्रमाणे घराची नुकसानभरपाई सुद्धा मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.