मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (15:42 IST)

पुण्यात हाहाकार खडकवासला धरणाचा कालवा फुटला, नागरिकांचे नुकसान

water left
पुण्यात आज अचनाक पूर आला आहे. यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांनी महापौरांना घेराव घातला आहे. सविस्तर वृत्त असे की पुणे शहरातून वाहनारा खडकवासला धरणाचा मोठा उजवा कालवा पर्वती लगतच्या जनता वसाहतीजवळ अचानक फुटला, त्यामुळे यातील लाखो लिटर पाणी अचानक वेगाने  घुसून घरातील सामान वाहून गेले. प्रचंड पाण्याचा लोट सिंहगड रस्त्यावर आला होता, त्याचा वेग इतका होता की रस्त्यावरील चार चाकी वाहने, दुचाकी गाड्या वाहून गेल्या आहे. त्यामुळे या घटनेने प्रचंड घबरात उडाली आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व रस्ते बंद केले आहे. पाण्याचा लोट एव्हडा प्रंचड होता की, घरातील गॅस सिलेंडर, डबे अन्य साहित्य आंबिल ओढ्यातून मुळा मूठा नदीपर्यंत वाहून गेले. फुटलेल्या कालव्याचे पाणी दांडेकर पुलावरून मांगीर बाबा मंदीरापर्यंत गेले. त्यामुळे रस्ता बंद करावा लागला. जनता वसाहतीतील सव्र्हे नं. 130 या झोपडपट्टीत पाणी शिरले त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. घर सोडून लोक पळत सुटले आहेत. कालवा फुटण्याची माहिती मिळताच जलसंपादन आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पाणी वहात असलेल्या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले.