मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:12 IST)

पोलिसांच्या धक्काबुक्कीत सुप्रिया सुळे यांच्या हाताला दुखापत

यवतमाळ येथून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल पदयात्रेने आज १५५ किमी. चा प्रवास पूर्ण करत नागपूर शहरात प्रवेश केला. भारावलेल्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन केले. शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी खा. Supriya Sule यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी झटापट करत, हिसके देत सुप्रियाताईंना पोलिस व्हॅनमध्ये चढवलं. या सगळ्या ओढाताणीत सुप्रिया सुळे यांच्या हाताला जबर दुखापत झाली. कार्यकर्त्यांचा आक्रोश व आक्रमक अवतार पाहून पोलिसांनी सुप्रिया सुळे व अन्य नेत्यांना सोडून दिले. त्यानंतर पुन्हा पदयात्रा सुरू झाली व आपल्या दुखावलेल्या हाताची पर्वा न करता सुप्रिया ताई पुन्हा हल्लाबोल करण्यासाठी सज्ज झाल्या.