शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:01 IST)

राणे यांची नाशिकमधून विधान परिषदेसाठी उमेदवारी? भाजपा विरुद्ध भुजबळ

·         नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर राणे यांना उमेदवारी 

·         भाजपा विरुद्ध शिवसेना आणि छगन भुजबळ

·         नारायण राणे यांच्या आडून भाजपाचा वार

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस मोठी राजकीय खेळी करणार आहेत. नारायण राणे यांना ते नाशिकमधून विधान परिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध राणे असे चित्र कायम राहत आता भाजपा व राणे विरुद्ध भुजबळ असे चित्र तयार होणार आहे. नजीकच्या काळात छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर येण्याची शक्याता आहे. त्यामुळे आधीच अंतर्गत कलहात असलेल्या नाशिक भाजपाला वाचवण्यासठी हे खेळी महत्वपूर्ण ठरणार आहे. तर शिवसेनेचा विरोध मोडून काढण्यासाठी ही खेळी जाऊ शकते. या आशयाचे वृत्त  आघाडीच्या मराठी वृत्तपत्रने दिले आहे.

छगन भुजबळ यांचा नाशिकवर एक हाती सत्ता होती. मात्र आधी राज ठाकरे आणि नंतर भाजपा ने त्यांच्या या सत्तेला सुरुंग लावला. मात्र शिवसेना आता राणे यांना विरोध करत असून शिवसेना कदाचित भुजबळा यांना छुपा पाठींबा देईल. मात्र मुख्यमंत्री जी राजकीय खेळी करत आहेत त्यामुळे आता शिवसेनाला मोठ्या प्रमाणत काम करावे लागणार आहे. अर्थात छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी राणे यांना उभे केले असून त्यामुळे भाजपा पुन्हा बाहेरून तमाशा बघणार आहे.

 जेव्हा कधी मंत्री मंडळ होईल तेव्हा राणे हे त्यात असतील असे अनेकदा रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री यांनी अप्रत्यक्ष सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी ही खेळी महत्वपूर्ण ठरणार आहे.

त्यामुळे पुढील वर्षी होणाºया नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर राणे यांना उमेदवारी देण्यात भाजपाला कुठलीही अडचण नसल्याचे खात्रीशीर वूत्त आहे.  दुसरीकडे भुजबळ जेव्हा बाहेर येथील तेव्हा ते झालेलं सर्व नुकसान आधी भरून काढतील त्यामध्ये हिरे कुटुंबीय सुद्धा भुजबळ यांच्या सोबत आहेत. त्यामुळे भुजबळ आल्यावर मोठे धक्के देतील. त्यामुळे आता भाजपाची ही खेळी शिवसेना आणि छगन भुजबळ कशी हाताळणार हे पाहावे लागणार आहे.