बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2017 (16:11 IST)

पर्यावरणाला हानी पोहोचवली, मग बसा दिवसभर कोर्टात

Court
पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांना  पुण्यातील दोन व्यक्तींना कोर्टाकडून अजब शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्यात दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी साठ हजार रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आलंय. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं झालेली पुण्यातील ही पहिलीच शिक्षा आहे.या घटनेमुळे नक्कीच अशा व्यक्तींवर चोप बसेल. आणि पुन्हा पर्यावरणाचा ऱ्हास करताना नागरिक विचार करतील?