मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2017 (16:13 IST)

विमानात माजी जवान आणि अधिकारी यांचे कौतुक

भारतीय नौदलातील आर्म्स या पाणबुडीला 50 वर्ष पूर्ण झालीय. त्यानिमित्त विशाखापट्टणमला सोहळा पार पडला. त्यात सहभागी होण्यासाठी माजी जवान आणि अधिकारी विमानाने विशाखापट्टणमला जात होते. 

यावेळी विमानाने उड्डाण केल्यावर पायलटने एक उदघोषणा केली. आपल्यासोबत नौदलातील माजी जवान आणि अधिकारी असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. यामुळे प्रवाशी आश्चर्यचकीत झाले. त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारला. सर्वांनी उभं राहून जवानांसाठी टाळ्या वाजवल्या. प्रवाशांनी जवानांशी संवाद साधला. 

 

देशासाठी जवान करत असलेल्या त्यागाबद्दल प्रवाशांनी जवानांचे आभार मानले. जवानसुद्धा या अनपेक्षितपणे झालेल्या कौतुकाने हरखून गेले होते. प्रवाशांकडून मिळालेल्या प्रेमाने ते गहिवरून गेले.