अजित पवार म्हणाले शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे  
					
										
                                       
                  
                  				  विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं आवाहन केलं आहे. कोरोनामुळं शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांची पावणे दोन वर्षं गेली. शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. 
				  													
						
																							
									  
	 
	सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम राज्यभरात राबवला गेला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.