सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मार्च 2020 (16:58 IST)

कोरोना जनतेने घाबरून न जाता सतर्कतेने वागावे - अजित पवार

मुंबई बई प्रवासाहून परत आलेले पुण्यातील एक दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी एका खासगी वाहनाद्वारे प्रवास केला होता, त्या वाहनाच्या चालकालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झालेय. या वाहनचालकाच्या वाहनात आणखी कोणीकोणी प्रवास केला होता, याचाही शोध सुरू आहे. अशा लोकांची माहिती मिळवून त्यांचीही त्वरीत तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिली. जनतेने घाबरून न जाता सतर्कतेने वागावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
कोरोनाबाबत राज्यात इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन व्हायला हवे. या संदर्भात चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी आज आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाबाबत जनतेच्या मनात भीती आणि काही गैरसमज आहेत. त्यामुळे याबाबत जनतेला योग्य ती माहिती मिळणे आणि शिक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे पब्लिक अवेअरनेससाठी मोठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील कोरोनाबाधीत ५ रूग्णांवर नायडू रूग्णालयातील विलगीकरण कक्षात योग्य ते उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.