फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना दिलेली ई-व्हिसा सुविधा आणि देण्यात आलेले व्हिसा रद्द
इटली आणि दक्षिण कोरियाला नुकतीच भेट दिलेल्या प्रवाशांना व्हिसा निर्बंधानंतर आता कोविड-१९ चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य राहणार आहे.
हे प्रमाणपत्र त्या-त्या देशांच्या आरोग्य मंत्रालयाने अधिकृत केलेल्या प्रयोगशाळेतून मिळवावे लागणार आहे. हे नियम सोमवारपासून लागू करण्यात आले असून, कोरोनाचा प्रादुभार्व असेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत.
ईटलीमधल्या भारतीय दूतावासाने भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपली माहिती त्यांच्या अर्जासोबत ऑनलाईन पाठवायला सांगितली आहे.