शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:50 IST)

अजित पवार यांचा 'हा' फोटो चांगलाच झाला व्हायरल

सोशल मीडियावर अजित पवार यांचा शिवसेना शाखेतील एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, अजित पवार गॉगल लावून एकटेच खुर्चीवर बसल्याचे दिसत आहेत.
 
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांनी  प्रचार केला. दरम्यान, याच कालावधीत अजित पवारांनी पंढरपूर आणि मंगळवेढा हे दोन्ही तालुके अक्षरश: पिंजून काढले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी  ते मंगळवेढ्यातील शिवसेनेच्या शाखेत गेले होते. अजित पवारांचा शिवसेनेच्या शाखेतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. 
 
सध्या भाजपच्या तिकीटावर लढणारे समाधान आवताडे आधी शिवेसेनेत होते. त्यांनी सेनेची मंगळवेढ्यात चांगली बांधणी केली होती. मात्र, सध्या ते याच मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी थेट शिवसेना संपर्क कार्यालयात जाऊन बैठक घेतली. त्यावेळी, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेही त्यांच्यासमवेत होते. या फोटोत अजित पवार हे शिवसेना कार्यालयात गॉगल लाऊन खुर्चीवर बसल्याचे दिसत आहेत. तर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पक्ष कार्यालयात खाली कार्यकर्त्यांसह बैठक मारून बसल्याचे दिसून येते.