1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Albino Cobra, rare white snake found in chandrapur

चंद्रपूर : दुर्मिळ पांढरा नाग सापडला

चंद्रपूर : दुर्मिळ पांढरा नाग सापडला
चंद्रपूर जिल्ह्यातल्या जुनोना गावात अत्यंत दुर्मिळ पांढरा नाग म्हणजेच अल्बिनो कोब्रा (Albino Cobra) आढळला आहे. जुनोना हे गाव जंगलाला लागून असून  रात्री विलास आलाम यांच्या घरी एक नाग दडून बसल्याचे दिसून आले. त्यांनी याच गावातील काही सर्पमित्रांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्रांनी हा नाग जेव्हा बाहेर काढण्यात आला, तेव्हा नाग पांढऱ्या रंगाचा होता.
 
विशेष म्हणजे हा नाग दुर्मिळ असण्यासोबतच दिसायला अतिशय सुंदर आणि पांढरा शुभ्र असतो. पांढरा नाग किंवा अल्बिनो कोब्रा ही वेगळी प्रजाती नसून नागाच्या डीएनएमध्ये बदल झाल्यामुळे नागाचा संपूर्ण रंग पांढरा दिसतो. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा पांढरा नाग आढळला आहे.
पुढील लेख
राम रहीम यांना 10 वर्षांची कैद