गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (15:08 IST)

मद्यधुंद एसटी बस वाहकाने प्रवासासाठी 800 रुपयांचं तिकीट फाडलं !

एसटी संप आता संपला आहे एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहे. एसटीच्या बस पुन्हा रुळावर येत आहे. हा संप संपल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पण यवतमाळ बस स्थानकावर प्रवाश्यांना मद्यधुंद एसटी बस वाहकामुळं चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. या मद्यधुंद बस वाहकाने दारूच्या नशेत चांगलाच धुमाकूळ घातला. त्याने राजुरा ते अमरावती प्रवासासाठी चक्क 800  रुपयांचं तिकीट फाडलं .
 
त्या मुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अक्षय बट्टे  असे या एसटी वाहकाचं नाव आहे. तो एवढा दारू प्यायला होता की  आपण काय करत आहोत ह्याचे त्याला काहीच भान न्हवते. त्याने दारूच्या नशेत अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट प्रवाशांना फाडून दिले. नंतर त्याने राजुरा ते अमरावती चक्क 800 रुपयांचे तिकीट प्रवाशाला फाडून दिले. नंतर तो दारूच्या नशेतच खाली लोळला. त्याचा अशा धुमाकुळानें प्रवाशी वैतागले होते. अखेर बस यवतमाळच्या  अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आणून वाहतूक नियंत्रकाने वाहकाच्या विरोधात तक्रार केली असता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.