सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:24 IST)

महापौरांसह सर्व २७ नगरसेवक जाणार राष्ट्रवादीत!

सत्तावीस नगरसेवकांनी आज काँग्रेस सोडली असून त्यात मालेगाव शहरातील काँग्रेसचे (Congress)सर्वेसर्वा, माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh)यांनी पत्नी व महापौर ताहेरा शेख यांच्याही समावेश आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत.
 
आमदार रशीद शेख पत्रकार परिषदेत म्हणालेत की, मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे. त्यासाठी विविध निधी व योजनांना मंजूरी हवी. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणीही मंत्री आम्हाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आमची नाराजी होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र गेल्या दोन वर्षात मालेगाव शहरासाठी काहीही निर्णय झाला नाही. हे फार काळ चालण्यासारखे नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात राहून काहीही उपयोग नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
 
पत्रपरिषदेत महापौर ताहेरा शेख यांसोबत मालेगाव महापालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याच्या माहितीला दुजोरा दिला. शेख यांचे पुत्र व माजी आमदार आसीफ शेख यांनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.