बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अलिबाग , बुधवार, 12 जुलै 2023 (07:49 IST)

रायगडात आदिती तटकरे यांच्‍या नावाला सर्व आमदारांचा विरोध

aditi tatkare
All MLAs oppose Aditi Tatkares name in Raigad राज्‍यातील सत्‍तेत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा प्रवेश झाल्‍यानंतर रायगडमधील राजकारण ढवळून निघायला सुरूवात झाली आहे. राज्‍यात पालकमंत्री पदावरून रायगड जिल्‍हयात पहिली वादाची ठिणगी पडली आहे. कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणारया राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्‍यास जिल्‍हयातून विरोध होत आहे. जिल्‍हयातील शिवसेना भाजपच्‍या सर्व आमदारांनी आदिती यांना पालकमंत्री करण्‍यास विरोध दर्शवला असल्‍याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.
रविवारी अजित पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली राष्‍ट्रवादी कॉंग्रेस राज्‍यातील शिंदे फडणवीस सरकारमध्‍ये सामील झाले. पहिल्‍याच फटक्‍यात ज्‍या 9 आमदारांनी शपथ घेतली त्‍यात श्रीवर्धनच्‍या आमदार आदिती तटकरे यांचाही समावेश आहे. त्‍यानंतर आता आदिती तटकरे यांचयाकडेच रायगडचे पालकमंत्री पद येणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्‍यामुळे रायगडमधील शिवसेना भाजपच्‍या आमदारांमध्‍ये अस्‍वस्‍थता आहे.
आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्‍यास रायगड जिल्‍हयातील शिवसेना भाजपच्‍या सर्व सहा आमदारांनी विरोध केला असल्‍याची माहिती आ. भरत गोगावले यांनी दिली. पूर्वी आम्‍ही सत्‍तेत शिवसेना भाजप असे दोनच पक्ष होतो. मंत्रीपदाच्‍या शर्यतीत नंबर असतानाही मी थांबलो. त्‍याचवेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी चर्चा करून पालकमंत्री पद शिवसेनेला देण्‍याचे निश्चित केले होते. त्‍यामुळे हे पद राष्‍ट्रवादीकडे जाण्‍याचा प्रश्‍नच येत नाही असे गोगावले यांनी स्‍पष्‍ट केले. आ. गोगावले यांच्‍या भूमिकेमुळे जिल्‍हयात अगामी काळात तटकरे विरूदध गोगावले असा संघर्ष पुन्‍हा पहायला मिळणार आहे.