मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2022 (10:20 IST)

लाऊडस्पीकर संदर्भात ठाकरे सरकारची सर्वपक्षीय बैठक आज

uddhav thackeray
सध्या राज्यात लाऊडस्पीकरचा वाद अद्याप थांबलेला नाही. सध्या राज्यात भोंग्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकार ने लाऊडस्पीकर बाबत काही नियम केले आहे. तरी ही  या बाबत वाद अजून कायम आहे. आज उद्धव ठाकरे सरकारने  भोंग्याच्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक तत्वे ठरविण्यासाठी सर्व पक्षीय बैठक  बोलावली आहे. या बैठकीत सर्व पक्षांनी उपस्थितीची हमी दिली असून मात्र या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या बैठकीत भाजपचे देवेंद्र फडणवीस, मनसेचे संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर सहभागी होणार आहे. मशिदीवरून भोंगे उतरवावे अन्यथा हनुमान चाळीस लावण्यात येईल असा इशारा मनसेने राज्य सरकारला दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या साठी गृहविभागाने तातडीची सर्व पक्षीय बैठक बोलाविली आहे. राज ठाकरे या बैठकीत उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यसरकार कडून भोंग्या बाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येण्याचे सांगितले जात आहे.