सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (16:11 IST)

पीएम केअर फंडातून मिळालेले सर्व व्हेंटिलेटर उत्तम कार्यान्वित :फडणवीस

परभणीतील कोरोना परिस्थितीचा विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. यावेळी फडणवीसांनी परभणीतील रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना माहिती दिली की, पीएम केअर फंडातून मिळालेले सर्व व्हेंटिलेटर उत्तम कार्यान्वित आहेत. याच व्हेंटिलेटरवर रुग्णांना उपचार दिला जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळजी घेणं गरजेचे असल्याचे फडणवीसांनी म्हटलंय तर राज्य सरकारने कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांना निश्चित केलेलं दराची घोषणा केली आहे. ही मागणी खूप आधी केली होती पंरतु ५० लाख रुग्णसंख्या झाल्यानंतर राज्य सरकारने घोषणा केली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
 
परभणी कोविड रुग्णालयात गेल्यावर तेथील डॉक्टरांनी सांगितले की पीएम केअरमधून मिळालेले सगळे व्हेंटिलेटर काम करत आहेत. त्याच व्हेंटिलेटरवर रुग्णांना उपचार केला जात आहे. औरंगाबादमध्ये एका कंपनीच्या व्हेंटिलेटरचा प्रॉब्लेम झाला बाकी तिथले पुर्वीचे व्हेंटिलेटरही चालू आहेत. परंतु इथे कोणताही अडथळा आढळला नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.