शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (18:09 IST)

फडणवीसांचा ताफा शेतकऱ्याने अडवून आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव आज जळगावातील वादळग्रस्त पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफा अडवून एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील उंचदा येथे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव योगेश पाटील आहे.माझ्या शेतात 20 हजार केळीचे बाग पावसात पूर्णपणे उध्वस्त झाल्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे. कोणीही मोठे नेते झालेल्या नुकसानाची साधी विचारपूस किंवा पाहणी करण्यासाठी आलेले नाही याची खंत बाळगत तसेच राग व्यक्त करीत त्याने हे पाऊल उचलण्याचे सांगत आहे.
 
गेल्या आठवड्यात आलेल्या मान्सून पूर्व अकाली पावसामुळे शेतकरींच्या केळीच्या बागेचे भरपूर नुकसान झाले त्यामध्ये त्यांचे सुमारे 20 हजार केळीचे झाडे उध्वस्त झाले. योगेश पाटील मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे गावातील रहिवासी असून त्यांचे केळीचे बाग आहे.त्या बागेचे पाऊसामुळे भलेमोठे नुकसान झाले आहे. 
 
दोन दिवसापूर्वीच जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील हे पाहणी साठी आले आणि त्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत केली जाईल असे म्हणून आश्वस्त केले होते.परंतु अद्याप पंचनामे केले नाहीत. आज देवेंद्र फडणवीस पाहणी करण्यासाठी आले परंतु आपल्या शेतात पाहणी केली नाही हा राग योगेशच्या मनात होता. त्या मुळे त्याचा संताप अनावर होऊन त्याने हे पाऊल उचलले. 
 
फडणवीस यांचा ताफा उंचदाच्या रस्त्यावरून जात असताना त्याने ताफा अडविला आणि हातातील विष प्राशन करू लागला तेवढ्यात त्याला पोलिसांनी अडविले आणि असं करण्याचे कारण विचारले असताना तो म्हणाला की शेतकऱ्यांना राज्याकडून एक रुपयाची ही कसलीच मदत होत नाही. शेतकऱ्यांनी काय करावे. असा राग त्याने व्यक्त केला.