1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 1 जून 2021 (16:13 IST)

कोविड नियम धाब्यावर बसवणारे इगतपुरीतील रिसॉर्ट सील, पोलीस अधीक्षकांची कारवाई

तालुक्यातील मौजे तळेगाव शिवारात मुंबई आग्रा महामार्गा लगत असलेले पंचतारांकीत हॉटेल विवांत रेसॉर्ट मध्ये शासन नियम धाब्यावर बसवत दोन दिवस लग्न सोहळे सुमारे दोनशे ते तीनशे लोकांच्या गर्दीत संपन्न झाले असताना सदर प्रकरण उघडकीस आल्यावर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर सदर रिसॉर्ट सील करण्यात आले आहे.
 
याअगोदरच रिसॉर्ट व्यवस्थापनाकडून वीस हजार रूपये दंड आकारणी करून कारवाई केली होती.मात्र शासन कारवाईला न जुमानता रिसॉर्ट मालक व चालक व्यावस्थापनेने ३० रोजी पुन्हा एक लग्न सोहळा याच ठिकाणी शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थीतीत पार पाडून शासन नियमांना केराची टोपली दाखविली .
 
सोमवारी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशाने तातडीने पोलीस उपनिरीक्षक अर्जुन भोसले,व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विवांत रिसॉर्ट चे मालक हरनाम शेट्टी व व्यवस्थापन अधिकारी हुकुमचंद धामी यांना नोटीस बजावत रिसॉर्ट सिलबंद केले.
 
नियमांचे उल्लघंन संदर्भ पत्र क्र.३ मधील बी नुसार पुढील आदेशान्वे कारवाई करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकारी, इगतपुरी आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरण तथा तहसिलदार व पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले ,पोलीस निरीक्षक,मंडल अधिकारी  यांनी हि कारवाई करून सदर आदेश जिल्हा कार्यालयाकडे टपाली सादर केल्याची माहिती तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली .
 
कोवीड विषाणु साथीचा रोग प्रादुर्भाव प्रतिबंध कायदा प्रमाणे जिल्हयात सर्व हॉटेल,धाबे,रिसॉर्ट इत्यादी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असतांना शासन नियमांचे उल्लघंन केल्याने कारवाई केली पुढील आदेशा पर्यंत  सिलबंद केलेले रिसॉर्ट बंद राहिल तरी सर्व हॉटेल व्यावसायीकांना विनंती आहे कि कोणीही शासन नियमांचे उल्लघंन करू नये. पोलीस अधीक्षक नाशिक.