गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (16:19 IST)

उल्हासनगरमध्ये 20 रुपयांसाठी चाकूने हत्या

उल्हासनगरमध्ये अवघे 20 रुपये देण्यास नकार दिल्याने एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल आहुजा असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल हा चहा च्या दुकानावर कामाला असून कुटुंबासोबत तो जय जनता कॉलनी परिसरात राहतो. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प 5 च्या जय जनता कॉलनीपरिसरात ही घटना घडली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी साहिल मैराळे हा जय जनता कॉलनीत बसला होता. त्याने रस्त्याने जाणाऱ्या अनिलकडे त्याने 20 रुपये मागितले. मात्र, अनिलने 20 रुपये देण्यास नकार दिला. आरोपी साहिलने रागाच्या भरात चाकू काढून अनिलच्या अंगावर अनेक ठिकाणी सपासप वार करुन साहिल पळून गेला. अनिलला स्थानिकांनी तात्काळ उल्हासनगरच्या  मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अनिलला तपासून मृत घोषित केले.
 
या हत्येची माहिती उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या 2 तासात आरोपी साहिलला कॅम्प 4 च्या सर्टिफाईट ग्राउंड जवळून ताब्यात घेतले गेले.