गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (15:57 IST)

महापालिका दिव्यांगांना तीन महिन्यांची पेन्शन देणार

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे दिव्यांगासाठी कल्याणकारी योजना राबविली जाते. या योजनेतील पात्र 4 हजार 148  दिव्यांगांना दरमहा 2 हजार रुपये याप्रमाणे तीन महिन्यांची पेन्शन दिली जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे लॉकडाऊनमध्ये या वर्गाला आर्थिक दिलासा मिळणार आहे.
 
दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा 2 हजार रुपये पेन्शन महापालिकेच्या वतीने दिली जाते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. एप्रिल, मे आणि जून 2021 या तीन महिन्यांचे एकत्रित सहा हजार रुपये दिव्यांगांच्या बँक खात्यात पाठविण्यात येत आहेत. तसेच, मतिमंद व्यक्तींना दरमहा 2 हजार 500 रुपये पेन्शन दिली जाते. एकूण पात्र 1 हजार 909 व्यक्तींनाही तीन महिन्यांचे पेन्शन देण्यात येणार आहे.
 
दिव्यांगांचे एकूण 2 कोटी 48 लाख आणि मतिमंदाचे 1 कोटी 43 लाख रुपये संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. लवकरच बँक खात्यामध्ये पेन्शनची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.