शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (09:10 IST)

Almattia Dam : अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवणार

almatti dam
अलमट्टी धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सकाळपासून आलमट्टी धरणातून 50 हजार क्यूसेकचा विसर्ग वाढवला होता. दरम्यान दुपारी अडीच वाजल्यापासून 1 लाख 75 क्यूसेकचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती कर्नाटक प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्य़ा गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
 
गेली चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील 71 बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पाणलोट क्षेत्रात जरी पावसाचा जोर कायम असला तरी जिल्ह्यात काही ठिकाणी आज सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली आहे.त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात येऊ शकते.