शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (14:41 IST)

तसेच पर्यटनासाठी अफजल खानची कबर खुली करायला हवी--------छत्रपती उदयनराजे भोसले

udyan raje bhosale
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर अफजल खानच्या थडग्याशेजारील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून हातोडा पडला आहे. पोलीस प्रशासनाने या परिसरात कलम १४४ लागू करून कठोर बंदोबस्त लावला होता. ४ जिल्ह्यातील १५०० पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. 
 
सदर कारवाईवर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अफझल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवलंच पाहिजे, असं उदयनराजे यांनी सांगितलं. कोणत्याही समाजाला गैरसमज करण्याची गरज नाही, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.
 
आताची आणि भावी पिढी आहे, त्यांना कळायला हवं, की ही कबर इथे का आहे..?, त्यामागील इतिहास काय?, याबाबत आताची आणि भावी पिढी आहे, त्यांना कळायला हवं, असं उदयनराजे यांनी सांगितलं. तसेच पर्यटनासाठी अफजल खानची कबर खुली करायला हवी, कारण त्याशिवाय इतिहास जिवंत राहणार कसा?, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. 
Edited by : Ratnadeep Ranshoor