गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (16:15 IST)

अंबादास दानवे यांच्या वडिलांचे निधन

ambadas danave
विधान परिषदेतील विरोधी पक्षाचे नेते अंबादास यांना पितृशोक आले आहे. यांचे वडील एकनाथराव अंबादास दानवे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी 5 वाजता निघेल.त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथे कैलास नगर श्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. 

अंबादास दानवे यांचा वडिलांचे निधन झाले. त्यांच्यावर मागील महिन्यापासून छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग  झाला होता. उपचाराधीन असताना त्यांची प्राण ज्योत मालवली.  
 
Edited by - Priya Dixit