शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (20:44 IST)

खळबळजनक, रुग्णासह रुग्णवाहिका पळवली

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव शिवारातून एका व्यक्तीने थेट रुग्णासह रुग्णवाहिकाच पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश म्हाळू रोंगटे हा रुग्णवाहिका चालक असून सोमवारी पेशंट व त्याचे नातेवाईकाला पुणेकडे घेवून जात होता. घारगाव शिवारातील हाॅटेल लक्ष्मी येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी तो काहीवेळ थांबला होता.
 
त्यावेळी पेशंटचे नातेवाईक हे देखील रुग्णवाहिकेतून खाली ऊतरले होते. त्याच वेळी नाट्यमयरीत्या एका व्यक्तीने पेशंटसह रुग्णवाहिकाच घेवून पोबारा केला. त्यांनतर नातेवाईकांनी तत्काळ घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. या घटनेचा तपास पोलीस  सुरू करून संगमनेर येथे ती रुग्णवाहिका ताब्यात घेतली.याप्रकरणी घारगाव पोलिसांनी वैभव सुभाष पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

चित्र: प्रतीकात्मक