बुधवार, 17 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (08:31 IST)

अमित शहा महाराष्ट्राचा नंबर वन शत्रू; ‘सामना’मधून संजय राउतांची टिका

Amit Shah Maharashtra's number one enemy
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिस्टर इंडिया चित्रपटातील खलनायक मोगॅम्बो असे संबोधून बॉलीवूड शैलीत टोला लगावून शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने शाह यांना क्रमांक एकचा शत्रू म्हटले आहे. अमित शहा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा नंबर एकचा शत्रू आसल्याचे म्हटले आहे.
 
केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी त्यांच्यावर खरपूस शब्दात टिका केली. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून अमित शहावर टिका करताना ते म्हणाले “आतापर्यंत, हे अगदी स्पष्ट झाले आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गद्दार गटाला पक्षाचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आणि अमित शहांच्या दयेमुळे मिळाले. हा माणूस महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा एक नंबरचा शत्रू आहे.” अशी खरमरीत टिका संपादकीयमध्ये संजय राउत यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “अमित शाह यांच्या राजकारणाला पाठिंबा देणारे आणि त्यांच्याशी जुळवून घेणार्‍यांनाही यापुढे राज्याचे शत्रू मानले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावर हल्ला करून तो संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोही राजवटींना धडा शिकवण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे.” असेही ते म्हणाले आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor