मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (14:31 IST)

दोन तासांसाठी ईडीची कमान द्या... अमित शहा शिवसेना यूबीटीमध्ये सामील होतील, संजय राऊतांचे वक्तव्य

sanjay raut
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते पक्षांतर करत आहे. शिवसेने युबीटीतील या सर्व प्रकारासाठी शिवसेना युबीटीचे नेते पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीला जबाबदार धरले आहे. संजय राऊत म्हणाले, मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पक्षांतर करून शिवसेना यूबीटी पक्षात सामील होतील.
उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि कोकणातून तीन वेळा आमदार असलेले राजन साळवी गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. ठाकरे यांचे आणखी काही नेते शिंदे गटात सामील होण्याचा दावा केला जात आहे. 
खासदार संजय राऊतांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, फक्त दोन तासांसाठी मला सीबीआय आणि ईडीची कमान ताब्यात द्या. अमित शाह देखील भाजपचा पक्ष सोडून शिवसेना यूबीटीच्या पक्षात मातोश्रीवर येऊन सामील होतील. सध्या शिंदे कोणाचा बळावर ऑपरेशन टायगर चालवत आहे.
आज ते सत्तेत आहे. उद्या वीज नसेल तर सम्पूर्ण दुकान रिकामं होणार. आमची देखील सत्ता होती. मात्र आम्ही त्याचा वापर कधीही सूडबुद्धीने आणि विकृत पद्धतीने केला नाही. असे राऊत म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit