शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (21:32 IST)

अमित ठाकरे म्हणतात .. मी केवळ माझ्या वडिलांमुळे राजकारणात.......

amit thackeray
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी राजकारणात आपण सक्रीय का झालो याचे त्यांनी गुपित सांगितले आहे. मी केवळ माझ्या वडिलांमुळे राजकारणात आल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली आहे.
 
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले असून ते म्हणाले, सध्या राजकारणाची परिस्थिती भयावय आहे. माझे वडील राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात आलो. त्यांनी संधी दिली म्हणून मी येथे आहे. अन्यथा माझा सारखा तरुण कधीच राजकारणात आला नसता, अशी काहीशी परिस्थिती सध्याच्या राजकारणात असल्याची खंत अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
 
सध्याच्या राजकारणात कोणत्याची पक्षाची आपली भूमिका नाही. लोक सध्या राजकारणाकडे मनोरंजन म्हणून पाहत आहे. राजकारण केवळ लोकांचे मनोरंजन बनून राहू नये. मात्र अशी परिस्थिती कायम राहू नये म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना पर्याय देत आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहोत. लोकांना राजकारण केवळ मनोरंजन म्हणून पाहू नये तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या पक्षाकडे वळण्याचं आवाहनही अमित ठाकरे यांनी केले आहे.

Edited By-Ratandeep Ranshoor