रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (21:27 IST)

अंधेरी पूर्व पोटनिवडणुक: आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत : प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar
राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा आहे.अशातच ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींनी पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.”
 
“शिवसेनेच्या कोणत्याही गटाबाबत सकारात्मक नाही. मात्र, व्यवस्थेचा विचार केला, तर माझ्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने जे चुकीचं सुरू होतं त्याबाबत मी माझी भूमिका मांडली. त्यात मी कायद्याची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले, तर काय होऊ शकतं याची सर्वोच्च न्यायालयानेच मांडलेली जंत्री मी लोकांसमोर मांडली,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

Edited By-Ratandeep Ranshoor