संबंधित माहिती
- ‘म्युकोरमायकॉसिस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा- सुधीर मुनगंटीवार
- Big Breaking : DRDO ने तयार केलं Corona वर औषध, लवकर होईल रुग्णांची रिकव्हरी
- अहमदनगर ब्रेकिंग : तरुणीवर अत्याचार व कुटुंबियांना मारहाण !
- ब्रेक द चैन’ मोहिमेत मुंबईकर यशस्वी होण्याच्या मार्गावर
- कोरोनाची साखळी तोडायची असल्यास स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊनची गरज
अमरावती ब्रेकिंग : ब्रेक द चेन संचारबंदीत थोडा बदल
अमरावती जिल्ह्यात १५ मेपर्यंत जारी संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात थोडा बदल करणारे शुद्धीपत्रक जिल्हा प्रशासनाने निर्गमित केले असून, दूध विक्री केंद्रे सकाळी ७ ते ११ या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालये, डेअरी, दूध संकलन केंद्रे, दुकाने यांना दूध संकलन व विक्री करण्यासाठी सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यान परवानगी राहील, असे अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी जारी केलेल्या शुद्धीपत्रकात नमूद आहे.
*बँका केवळ अंतर्गत कामासाठी सुरू; ग्राहकांना ऑनलाईन सेवा*
सर्व प्रकारच्या वित्तीय सेवा उदाहरणार्थ, बँका, पतसंस्था, पोस्ट कार्यालये, तसेच स्टॉक मार्केटशी संबंधित सेवा या केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व त्यांना विहित करण्यात आलेल्या वेळेनुसार त्यांच्या अंतर्गत कामासाठी सुरू राहतील. ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याचे आदेश आहेत.
