शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शनिवार, 8 मे 2021 (16:45 IST)

Big Breaking : DRDO ने तयार केलं Corona वर औषध, लवकर होईल रुग्णांची रिकव्हरी

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोरोनाच्या उपचारांसाठी एका औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन एंड अलायड साइंसेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) सह मिळून तयार केली गेली आहे. या औषधाला आता 2-deoxy-D-glucose (2-DG) नाव देण्यात आलं आहे. याच्या मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डी प्रयोगशाळांना देण्यात आली आहे. 
 
याच्या वैद्यकीय क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. असा दावा केला जात आहे की ज्या रुग्णांवर याचं ट्रायल करण्यात आले त्यांच्यामध्ये फास्ट रिकव्हरी बघायला मिळाली. सोबतच रुग्णांची ऑक्सिजनवर निर्भरता कमी झाल्याचे दिसून आले. औषध वापरल्यामुळे इतर रुग्णांच्या तुलनेत कोरोना अहवाल निगेटिव्ह होत असल्याचा दावाही केला जात आहे.
 
एप्रिल 2020 मध्ये डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी या औषधाचा प्रयोग प्रयोगशाळेत केला. प्रयोगात असे आढळले की हे औषध कोरोना विषाणूपासून बचाव करण्यात मदत करते. या आधारावर DCGI ने मे 2020 मध्ये फेज-II ट्रायल्ससाठी मंजूरी दिली होती. 
 
क्लीनिकल ट्रायल्समध्ये काय समोर आलं?
फेज-II: हे औषध देशभरातील रूग्णालयात आजमावलेले आहे. फेज-IIa च्या ट्रायल 6 आणि फेज-IIb च्या ट्रायल 11 रुग्णालयात केले गेले. 110 रुग्णांना सामील केले गेलं. हे ट्रायल मे ते ऑक्टोबर या दरम्यान करण्यात आले. 
परिणाम
ज्या रुग्णांवर या औषधाचा प्रयत्न केला ते इतर रुग्णांच्या तुलनेत वेगाने बरे झाले. ट्रायलमध्ये सामील रुग्ण इतर रुग्णांच्या तुलनते 2.5 दिवसांपूर्वी बरे झाले. 
 
फेज-III: डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान देशभरातील 27 रुग्णालयांमध्ये फेज-III चे ट्रायल्स झाले. यंदा 220 रुग्णांना यात सामील केलं गेलं. हे ट्रायल देहली, यूपी, बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडु येथे केले गेले.
परिणाम
ज्यांना 2-DG औषध दिले गेले त्यापैकी 42% रुग्णांची तिसर्‍या दिवशी ऑक्सीजनवर अवलंबित्व संपलं. परंतू ज्यांना औषध दिले गेले नाही अशा 31% रुग्णांचीच ऑक्सीजनवर निर्भरता संपली. अर्थात औषधाने ऑक्सिजनची आवश्यकता देखील कमी झाली. एक चांगली गोष्ट अशी आहे की 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांमध्येही समान प्रवृत्ती दिसून आली.
 
हे औषध कसे कार्य करते?
हे औषध पावडर रुपात येतं ज्या पाण्यात घोळून देण्यात येतं. हे औषध संक्रमित पेशींमध्ये जमा होते आणि व्हायरल सिंथेसिस आणि ऊर्जा उत्पादन करुन व्हायरस वाढण्यास प्रतिबंधित करते. या औषधाची विशेष गोष्ट म्हणजे ती व्हायरस संक्रमित पेशी ओळखते. जेव्हा संपूर्ण देशभरात रुग्णांची संख्या सतत वाढत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अशा वेळी हे औषध खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. असा दावा केला जात आहे की औषधांमुळे रुग्णांना बराच काळ रुग्णालयात राहण्याची गरज भासणार नाही.