बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (09:24 IST)

रॅपिड टेस्टिंग किट बनवण्यासाठी 'हा' देश मदत करणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात रॅपिड चाचण्यांचेही सत्र सुरू आहे. कमीत कमी वेळेत चाचण्यांचे अचूक निदान देणाऱ्या उपकरणांवर संशोधनदेखील केले जात आहे. भारतात ३० सेकंदात रिझल्ट देणाऱ्या रॅपिड टेस्टिंग किट बनवण्यावर काम सुरू असून यामध्ये इस्त्राइल देशातील एक एक्सपर्ट टिम सहकार्य करत आहे. त्याकरता इस्त्राइल मधील एक्सपर्ट टिम भारतात येत असून त्यांच्या दूतावासने याची माहिती दिली आहे.
 
इस्त्राइलचीचे दूतावास यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत इस्त्राइलच्या परराष्ट्र, संरक्षण आणि आरोग्य मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली भारत आणि इस्त्राइल अँटी – कोविड – १९ को – ऑपरेशन ऑपरेशन हाती घेणार आहे. इस्त्राइलच्या संरक्षण मंत्रालयाच्या विशेष विमानातून ही टिम दिल्लीत दाखल होणार आहे. ही टिम भारतातील मुख्य वैज्ञानिक सल्लाकार के. विजयराघवन आणि संरक्षण अनुसंधान व विकास संघटन (DRDO) सोबत रॅपिड टेस्टिंग किट बनवण्यात सहकार्य करणार आहे. हे किट बनवण्यासाठी इस्त्राइलच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊन कोरोनाने विस्कळीत झालेल्या भारतीयांचे जनजीवन रूळावर आणण्यास उपयुक्त ठरणार आहे. या विशेष विमान प्रवासातून मेकॅनिकल व्हेंटिलेटर्सची डिलिव्हरी केली जाणार आहे. इस्त्राइलच्या सरकारने भारततील याच्या निर्यातीकरता खास परवानगी दिली आहे.