शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (14:57 IST)

नेटवर्किंग चांगले ठेवण्यासाठी...

जर आपण कामाच्या ठिकाणी सहकार्यां बरोबर चांगले नेटवर्क तयार केले तर आपल्याला व्यावसयिक जीवनात बर्या पैकी फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी औपचारिकता बाळगल्यास सहकार्यांकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकते. वाढदिवस, लग्राचा वाढदिवस, कंपनीकडून मिळालेले प्रशस्तीपत्र, बढती यानिमित्ताने सहकार्यांचे कौतुक करायला शिका आणि संबंध आणखी दृढ करा. तसेच संकटकाळात, अडचणीच्या काळातही सहकार्यांतची भावना मनात ठेवा. यातून सहकार्यांचसमवेतचे संबंध केवळ ऑफिसपुरतेच मर्यादित न राहता अनौपचारिक होतात. अशा संबंधाचा लाभ दोघांनाही मिळतो.
 
आणि व्यवसायिक पातळीवर पुढे जाण्यासाठी आपल्याबाबत गुडवील तयार होते. सहकार्यांसमवेत नेटवर्क कसे वाढवावे, याबाबत टिप्स इथे सांगता येतील.नम्रता असावीः नम्र स्वभावामुळे समोरील व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. त्यातून नाते अधिक दृढ बनते. एखाद्या कंपनीत ध्येय साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी एकत्रपणे काम करत असतात. यासाठी आपल्याला त्यांची मदत करायला हवी, जेणेकरून आपली कंपनी ध्येय प्राप्त करेल. चर्चा करत राहाःव्यावसायिक जीवनात संवादासाठी नेहमीच संधी शोधायला हवी. सहकार्यां ची आठवण कामाशिवायही काढायला हवी. केवळ स्वार्थासाठी कोणाशी संबंध जोडणे बरोबर नाही आणि तसा प्रयत्नही करु नये.
 
एकत्रपणे काम कराः कोणत्याही प्रकल्पावर एकत्रपणे काम करताना केवळ आपण नेटवर्क मजबूत करत नाही तर व्यावसायिक जीवनातही आघाडी घेत असतो. म्हणूनच सर्वांसमवेत काम करण्याची तयारी ठेवायला हवी. त्याचबरोबर काम करताना आपण एकमेकांची पद्धत जाणून घ्यायला हवी.

यशाचा आनंद साजरा कराः ऑफिसमधील कोणाच्याही यशावरून मनात असूया, इर्षा बाळगू नका. उलट सहकार्यांयच्या यशाचे कौतुक करा. दुसर्यासच्या यशाचा आनंद साजरा केल्याने स्वतःच्या यशाचा मार्गदेखील सुकर होतो.

गटाशी एकसंध राहाः आपल्याला ज्या मंडळींबरोबर काम करायचे आहे, त्यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले राहा. सुसंवाद आणि संपर्क हा नेटवर्किंग सुधारण्याचा पाया आहे हे विसरू नये आणि नेटवर्किंग उत्तम असणे हे कोणाही व्यक्ती अथवा संस्थेचे बहुमूल्य भांडवल असते.
मेघना ठक्कर