मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (12:25 IST)

DRDO मध्ये 10वी उर्त्तीण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

10वी उर्त्तीण करुन ITI करणार्‍या तरुणांसाठीरने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. DRDO च्या विविध ट्रेड्समध्ये अप्रेंटिसच्या 79 रिकाम्या पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार DRDO च्या ऑफिशियल नोटिफिकेशन बघून अर्ज करु शकतात. DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर नोटिफिकेशन बघता येईल.
 
15 मे पर्यंत अर्ज करु शकतात उमेदवार
अर्ज करणारे उमेदवार अप्रेंटिसशिप इंडियाच्या पोर्टल apprenticeshipindia.org वर जाऊन अर्ज करु शकतात. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 मे आहे.
 
शैक्षणिक योग्यता
अर्ज करु इच्छित उमेदवार 10वी उर्त्तीण किंवा IIT सर्टिफिकेट प्राप्त असावे. नोटिसप्रमाणे पोस्ट-ग्रेजुएट उमेदवारांना या पदांसाठी अयोग्य मानलं जाईल आणि त्यांचा अर्ज स्वीकार होणार नाही.
 
पदांची तपशील
फिटर - 14, 
मशीनीस्ट - 06, 
टर्नर - 04, 
कारपेंटर - 03, 
इलेक्ट्रीशियन - 10, 
इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक - 09, 
मॅकेनिक (मोटर वाहन) - 03, 
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) - 07, 
काम्प्युटर आणि परिधीय हार्डवेअर दुरुस्ती आणि देखभाल यंत्र - 02, 
काम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टेंट (COPA) - 05, 
डिजिटल फोटोग्राफर - 06, 
सेक्रेटेरियल असिस्टेंट - 08, 
स्टेनोग्राफर (हिंदी) - 01, 
स्टेनोग्राफर (इंग्रजी) - 01