रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (08:54 IST)

अमरावती : बंद घरात आढळले मायलेकीचे मृतदेह

death
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षक सन्मती कॉलनीतील एका बंद घरात मायलेकीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गाडगेनगर पोलिसांनी घराचा बंद दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
 
सुवर्णा प्रदीप वानखडे (51) व मृणाल प्रदीप वानखडे (25)अशी मृत मायलेकीची नावे आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सुवर्णाचे पती तथा मृणालचे वडील हे दर्शनासाठी शेगावला गेल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. ते यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही मायलेकी घराच्या बाहेर पडल्या नाहीत, त्यामुळे काही शेजाऱ्यांनी वानखेडे यांच्या घराचे दार ठोठवले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी गाडगेनगर ठाण्याला माहिती दिली.
Edited By- Ratnadeep Ranshoor