सांगली: SS Global कंपनीने केली पितापुत्रांची २६ लाखाची फसवणूक
सांगली: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन दामदुप्पट रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून SS Global कंपनीने पितापुत्रांची २६ लाखाची फसवणूक केली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात सोमवारी पिता-पुत्राने स्वतंत्ररित्या फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, संशयित म्हणून मिलिंद बाळासो गाडवे, प्रियांका मिलिंद गाडवे, रवी गाडवे (तिघेही रा. सांगलीवाडी), अविनाश पाटील (रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि चेतन चव्हाण (रा. मिरज) या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीचा प्रमुख मिलिंद बाळासाहेब गाडवे (सांगलीवाडी) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. मिलिंद गाडवे याच्या एस. एस. ग्लोबल सह अन्य काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात २५ गुंतवणूकदारांची दोन कोटी ५ लाख ६० हजार ६९२ रूपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली होती.
तक्रारदारांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले होते. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी पदभार हाती घेतल्यावर आर्थिक फसवणूकीसंदर्भात संबंधितांनी धाडसाने पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन केले होते.
Edited By- Ratnadeep Ranshoor