गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (09:05 IST)

कुलरनं घेतला चिमुकल्याचा जीव, विजेचा शॉक लागून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

An 11-year-old boy died of electric shock while cleaning a cooler in Yavatmal yawatmaal Babhulgaon sawar News  कुलरनं घेतला चिमुकल्याचा जीव
यवतमाळमध्ये कुलर साफ करताना विजेचा शॉक लागून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. संकल्प ढवळे या अवघ्या ११ वर्षांच्या मुलाचा करूण अंत झालाय. यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे ही दुर्घटना घडली. घरात सुरू असलेल्या कुलरची सफाई सुरू होती. कूलरमध्ये अडकलेला कचरा काढून तो छिद्रांमध्ये साफसफाई करत होता. त्याचवेळी विजेचा जोरदार शॉक त्याला लागला. शेजारीच असलेल्या आजोबांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लागलीच कुलर बंद केला. पण तोपर्यंत संकल्पचा बळी गेला होता.
 
चंद्रपुरात काही दिवसांपूर्वीच कुलरचा शॉक लागून एका 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. खेळत असताना कुलरच्या स्टँडला हात लागल्याने चिमुकल्याचा जीव गेला. कूलरच्या स्टँडमध्ये करंट उतरलं होतं.