1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (09:47 IST)

लसीकरण नोंदणीसाठीचे अ‍ॅप म्हणजे असून अडचण नसून खोळंबा…

राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, अ‍ॅपवरील तांत्रिक अडचणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महसूलमंत्री थोरात यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
 
यावेळी मंत्री थोरात यांनी, जिल्ह्यातील करोनासंदर्भातील सद्यस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
मात्र, जिल्ह्यातील रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
 
नागरिकांनीही आता प्रशासनाच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य करण्याची गरज असून त्यामुळेच करोना संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
 
कोवीस अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर मुंबई-पुण्यातील लोक लसीकरणासाठी संगमनेरात आले आहेत. रात्रीच मुक्कामी येवून ते लस घेतात, असा प्रकार स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिला. त्यामुळे स्थानिकांना लस मिळत नाही.