गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

Mother’s Day Wishes In Marathi मदर्स डे शुभेच्छा

Mother’s Day Wishes In Marathi
मातृ दिनाच्या शुभेच्छा
Happy Mothers Day
मराठीतून मदर्स डे शुभेच्छा
 
ती आहे म्हणून सारे विश्व आहे, 
ती आई म्हणूनच मी आहे
ती आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
फुलात जाई, 
प्रार्थनेत साई
पण जगात सगळ्यात भारी आपली आई...
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
हजार जन्म घेतले तरी 
एका जन्माचेही ऋण फिटणार नाही 
आई लाख चुका होतील माझ्याकडून
पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई 
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई 
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात 
आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास...
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
जगी माऊलीसारखे कोण आहे 
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही 
या ऋणाविना जीवनास साज नाही 
Happy Mothers Day
 
माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही 
कितीही कामात असली माझ्याशी बोलणे विसरत नाही
कितीही चिडलो तिच्यावर तरी ती मात्र माझ्यावर चिडत नाही
म्हणून तर आई मला तुला सोडून कुठेच जावेसे वाटत नाही 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
उन्हामधली सावली तू
पावसातली छत्री तू 
हिवाळ्यातली शाल तू 
माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच 
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय 
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
माझ्या हृदयात एकाच व्यक्तीला अढळ स्थान
आणि ती म्हणजे तू आहेस माझी आई महान
Happy Mothers Day
 
ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला
आई मी भाग्यवान आहे की, मी तुझ्या पोटी जन्माला आला
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
पूर्वजन्माची पुण्याई असावी जो जन्म तुझ्या पोटी घेतला
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
आई मातृदिनाच्या शुभेच्छा!
 
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तर तू आहेसच
पण तू माझी आहेस याचा मला अभिमान आहे
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
माझ्यासाठी जिच्या ओठावर फक्त असतो आशिर्वाद
अशा आईला माझा शत-शत नमस्कार 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही
बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही 
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा