मातृ दिन विशेष मातृ दिन निबंध

matru diwas
अमेरिकेतील 28 व्या राष्ट्राध्यक्ष थॉमस वूडरॉ विल्सन यांनी 8 मे 1914 रोजी मे महिन्यातील दुसरा रविवार अधिकृतपणे मातृदिन म्हणून जाहीर केला. तेव्हा पासून दरवर्षी
मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृ दिन.आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेचा स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगितले आहे. आई हीच मुलाची प्रथम गुरु आहे. आई या शब्दाचा अर्थ आहे 'आ 'म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर .असे म्हणतात की ईश्वर या जगात सर्वत्र येऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आई आपल्या मुलांना चांगल्या संस्काराची शिदोरी लहान पणा पासूनच देते. मुलांचे सर्व जग किंवा विश्व त्यांची आईच असते. असा एकही दिवस नाही की आपल्याला आईवाचून काही अडले नाही. असे म्हटले आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. हे तंतोतंत खरेच आहे. जगातील सर्वात श्रीमंत तो आहे ज्याच्या कडे आई आहे. ज्याच्या कडे आईरूपी दैवत नाही मग तो राजा असो किंवा रंक त्याची दशा भिकारी सम आहे.

आई आहे तर जगातील सर्व सुख आहे. आई वंदनीय आहे.खरं आहे.खरं तर तिला सन्मान देण्यासाठी कुठला खास दिवस कशाला पाहिजे ? ती तर दररोज सन्माननीय आहे. आदरणीय आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची ती काळजी घेते ,कष्ट करते ,घरासाठी राब- राब राबते. मुलांना चांगले संस्कार देते.
मातृदिन संपूर्ण विश्वात साजरे केले जाते. पाश्चिमात्यांच्या देशात आईचे आभार मानण्याची पद्धत आहे. आईला काही भेट वस्तू देणे, तिच्या सोबतीने वेळ घालवणे, अश्या पद्धतीने हा दिन अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशात मातृदिन म्हणून साजरा केला जातो.हा दिवस आपल्या आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु प्रश्न असा उद्भवतो की आपण आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो का ? ती आपल्या कुटुंबासाठी झटत असते कष्ट करते तरीही कधी थकत नाही. हास्य मुखाने आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी करत असते . तिच्या या कष्टाला मानाचा मुजरा.
यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

आरोग्य आणि शांतीसाठी 6 योग टिपा

आरोग्य आणि शांतीसाठी 6 योग टिपा
अनियमित जीवनशैली आणि धावपळमुळे अनेक रोग, दुःख आणि मानसिक त्रास उद्भवतात.अशा परिस्थितीत, ...

मूड ऑफ असेल पार्टनरवर ओरडू नका, हे 5 काम करा

मूड ऑफ असेल पार्टनरवर ओरडू नका, हे 5 काम करा
जीवन हे संघर्षाचे नाव आहे. कधीकधी तुमच्या आयुष्यात छोट्या छोट्या समस्या येतात, ज्याचा ...

Rava Upma Recipe रवा उपमा पौष्टिक नाश्ता

Rava Upma Recipe रवा उपमा पौष्टिक नाश्ता
जर तुम्हाला नाश्त्यात काहीतरी हलके आणि चवदार बनवायचे असेल तर तुम्ही रवा उपमा ट्राय करू ...

NDA ची परीक्षा आता मुलीही देणार, पण आव्हानांचं काय?

NDA ची परीक्षा आता मुलीही देणार, पण आव्हानांचं काय?
असं सुप्रीम कोर्टाने बुधवारी (22 सप्टेंबर) स्पष्ट केलं. NDA मध्ये महिलांचा प्रवेश याच ...

Health Care Tips: जर आपण देखील दररोज अंडी खात असाल तर या ...

Health Care Tips: जर आपण देखील दररोज अंडी खात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या
अंडी खाणं आरोग्यासाठी चांगले मानले आहे.जर आपण दररोज अंडी खात असाल तर काही गोष्टी लक्षात ...